अरे बाप रे! क्रिकेट सामन्यात 'सामनावीर' विजेत्यास देण्यात आले 2.5 किलो फिश, जाणून घ्या यामागील कारण
सामनावीर म्हणून 2.5 किलो फिश पुरस्कार देण्यात आला (Photo Credits: Twitter)

कोणत्याही क्रिकेट सामन्यात शानदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला सामन्यानंतर 'सामनावीर' म्हणून निवडले जाते. या दरम्यान त्यांना ट्रॉफी किंवा इतर वस्तू देऊन पुरस्कृत केले जाते. अलीकडेच काश्मीरच्या (Kashmir) टेकीपोरा कुपवाडा (Tekipora Kupwara) येथे क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लीगमध्ये सामनावीर म्हणून निवडल्या गेलेल्या सामन्यात खेळाडूला देण्यात  बक्षीस सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सामनावीर पुरस्कार जिंकणार्‍या खेळाडूला सामन्यानंतर 2.5 किलो मासा देण्यात आला. पत्रकार फिरदौस हसन (Firdous Hassan) यांनी त्याचे काही फोटो आपल्या सोशल मीडियावर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आणि काही काळानंतर तो व्हायरल झाला. क्रिकेट चाहत्यांनी बर्‍याच रोचक टिप्पण्या केल्या आहेत. जेव्हा एका यूजरने त्याला या अनोख्या भेटवस्तूच्या उद्देशाबद्दल विचारले तेव्हा त्याने हे उघड करून सांगितले की हे खेळाच्या मैदानाची दयनीय स्थिती दर्शविण्यासाठी केले गेले आहे.

त्यांनी म्हटले की, "माशाची कल्पना लीगला लोकप्रिय करणे आणि खेळाच्या मैदानाची दयनीय स्थिती दर्शविणे आहे. खेळण्यायोग्य खेळपट्टी तयार करण्यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून हातभार लावावा लागला," असे ते म्हणाले. ग्राउंडची परिस्थिती अत्यंत वाईट होती आणि स्वतः खेळाडूंनी पैसे गोळा केले आणि खेळाचे मैदान तयार केले.

जाणून घ्या कारण...

सामनावीर म्हणून पुरस्काराबद्दल बोलायचे तर भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला पूर्वीप्रमाणे मिनी ट्रक पुरस्कार मिळाला होता. 2017 मध्ये श्रीलंका दौर्‍यावर बुमराहला मॅन ऑफ द सीरिज म्हणून एक मिनी ट्रक देण्यात आला होता. त्याशिवाय 2013 मध्ये ढाका प्रीमियर लीगमध्ये इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गनला उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेशर कुकर मिळाला होता. 2013 मध्ये ढाका प्रीमियर लीगमध्ये लूक राइटला एकदा ब्लेंडर देण्यात आला होता.