भारताच्या (India) पहिल्या वर्ल्ड कप (World Cup) विजयला आज एकूण 37 वर्ष पूर्ण झाली. कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारताने दोनदा विश्वविजेता वेस्ट इंडिजचा पराभव करून 1983 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. अशक्य अशी कामगिरी करत कपिल देव यांच्या टीम इंडियाने इतिहास घडवला. या एका विजयामुळे नंतर पूर्ण भारतीय क्रिकेटचाच चेहरा-मोहरा बदलून गेला. पण, आज आपण कधी न ऐकलेली अशी एक कहाणी तुम्हाला सांगणार आहोत, जेणे करून तुम्हीही थक्क व्हायला. 'काश आपण तेव्हा तिथे उपस्थित असतो'! अशी इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात 1983 वर्ल्ड कप दरम्यान होती आणि कदाचित ती आयुष्यभर राहील. पण अशी एक व्यक्ती आहे जिला अखेरचा सामना थेट स्टेडियममधून पाहण्याची संधी मिळाली, पण तिने ती गमावली. आणि ती व्यक्ती म्हणजे कपिल यांची पत्नी रोमी देव (Romi Dev). (On This Day in 1983: 37 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी भारत बनला होता विश्वविजेता, कपिल देवच्या टीम इंडियाने रचला होता इतिहास)
वर्ल्ड कपच्या तीन वर्षांपूर्वी कपिल देव यांनी 1980 मध्ये रोमी भाटियाशी लग्न केले. 1983 च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान ती लंडनमध्ये होत्या आणि रोमी अंतिम सामना पाहण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर उपस्थित होत्या. तथापि, भारतीय संघाच्या फलंदाजीने त्या खूप निराश झाल्या. भारताने पहिले फलंदाजी करत फक्त 183 धावा केल्या. सामन्या दरम्यान स्टेडियममध्ये बरेच वेस्ट इंडिज चाहते उपस्थित होते. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी चौकार ठोकताच चाहते जोरात प्रतिसाद द्यायचे. हे पाहून रोमी खूप अस्वस्थ झाली आणि खूप रडल्या. त्यांनी दुसऱ्या व्यक्तीला पास दिला आणि स्टेडियम बाहेर निघून गेल्या. काही वेळाने भारतीय गोलंदाजांनी विकेट घेण्यास सुरुवात केली, हे कळताच रोमी यांनी पुन्हा आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पास नसल्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. इतकेच नाही तर हॉटेलवर परतल्यावर जेव्हा कपिल त्यांच्याशी मॅचबद्दल बोलायचे तेव्हा त्यांनी संपूर्ण सामना पहिला असे भासवून द्यायचे. एक वर्षानंतर कपिल यांना सत्य कळले.
दुसरीकडे, साखळी फेरीत भारताचा सामना झिम्बाब्वेशी झाला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वे संघाने 235 धावा केल्या होत्या. भारताची सुरुवात खूप खराब झाली होती. 9 धावांवर भारताने 4 विकेट गमावल्या, पण कपिल यांनी 175 धावांची दमदार खेळी केली आणि स्वबळावर सामना जिंकून दिला. पण, त्या दिवशी BBC चा संप असल्याने कपिल यांची ऐतिहासिक खेळीचे रेकॉर्ड होऊ शकली नाही.