Rohit Sharma

टीम इंडियाने (Team India) काल झिम्बाब्वे (Zimbabwe) विरुद्ध सुपर-12 चा शेवटचा सामना खेळला. या सामन्यात भारतीय संघाने 71 धावांनी मोठा विजय मिळवला. मेलबर्न क्रिकेट मैदानावर (Melbourne Cricket Ground) हा सामना खेळला गेला. या सामन्यानंतर गुरुवार, 10 नोव्हेंबरला भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीचा सामना खेळणार असल्याचेही स्पष्ट झाले. झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अशी घटना घडली, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.  खरंतर, सामन्याच्या मध्यभागी एक मुलगा रोहित शर्माला भेटण्यासाठी मैदानात घुसला. मुलाच्या या कृत्यासाठी त्याच्यावर लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

तो मुलगा रोहित शर्माचा चाहता होता असे सांगण्यात येत आहे. रोहित शर्माला भेटण्यासाठी मुलाने मैदानाचा सुरक्षा कठडा तोडला आणि सामन्याच्या मध्यभागी तो थेट मैदानावर आला. मात्र, सामन्यामुळे रोहित शर्मासोबत मुलाची चांगली जुळवाजुळव होऊ शकली नाही. सुरक्षा गराडा ओलांडणे मुलासाठी मोठी समस्या बनली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कृत्यासाठी मुलाला सुमारे 11 हजार 95 डॉलर (सुमारे 6.50 लाख) दंड ठोठावण्यात आला आहे.

दंडाची रक्कम मैदानावरील मोठ्या स्कोअर बोर्डवरही दाखविल्याचे सांगण्यात आले. मुलाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये रोहित शर्माला भेटल्यानंतर मुलगा भावूक झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. मुलाच्या डोळ्यात अश्रू असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.  व्हिडिओमध्ये हे देखील स्पष्टपणे दिसत आहे की सुरक्षा कर्मचारी मुलाला बाहेर काढू लागताच रोहित शर्मा सुरक्षा कर्मचार्‍यांना काहीतरी बोलताना दिसत आहे.