IND vs PAK (Photo Credit - Twitter)

श्रीलंका क्रिकेट बोर्ड (Srilanka Cricket Board) आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) आशिया चषक 2023 साठी टीम इंडियाला पाकिस्तानला न पाठवण्याच्या निर्णयाला बीसीसीआयला आपला पाठिंबा दर्शविला आहे. शिवाय, बांगलादेश आणि श्रीलंका हे दोन्ही देश या स्पर्धेचे यजमानपदासाठी उत्सुक आहेत. BCCI ने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिल्यानंतर

PCB आणि BCCI ने एकमेंकावर टिका केली होती. बीसीसीआयच्या या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून पीसीबीने भारतात होणाऱ्या विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशिया चषक 2023 साठी खास नियोजन केले असून भारताचे सामने पाकिस्तानच्या बाहेर खेळवले जाऊ शकतात. तथापि, बीसीसीआय हा प्रस्ताव स्वीकारण्याची शक्यता नाही, ज्यामुळे दोन्ही बोर्डांमध्ये सध्या तणाव पहायला मिळत आहे. पीसीबीचे प्रमुख नजम सेठी यांनी आधीच सांगितले आहे की, जर भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानमध्ये आला नाही तर पाकिस्तानचा एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळण्याची शक्यता खूपच कमी आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष नजम शेठी यांनी सध्या आडमुठी भूमिका घेतली असून जर भारताने आपला संघ पाकिस्तानला आशिय चषकासाठी पाठवला नाही तर आमचे सरकार ही पाकिस्तान संघाला भारतात जाऊ देणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. तसेच बीसीसीआयने या प्रकरणी काही मध्य मार्ग काढावा असे देखील त्यांनी म्हटले आहे. पंरतू भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याप्रकरणी आक्रमक असून कोणत्याही परिस्थिती पाकिस्तानला न जाण्याचा त्यांचा निर्णय आहे आणि या निर्णयाला श्रीलंका आणि बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा देखील मिळाला आहे.