![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2021/09/Virat-Kohli-Team-IND-2021-380x214.jpg)
टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहलीने (Captain Virat Kohli) मोठी घोषणा केली आहे. विराट कोहलीने एका निवेदनात म्हटले आहे की, टी20 विश्वचषकानंतर (World cup) मी टी20 स्वरूपातील कर्णधारपद (Captaincy) सोडणार आहे. कोहली म्हणाला, मी माझ्या जवळच्या लोकांशी, मुख्य प्रशिक्षक प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर टी20 स्वरूपातील कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या कर्णधारपदाच्या काळात संघाला खूप काही दिले आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन मी निर्णय घेतला आहे. 2021 टी20 विश्वचषक फॉरमॅटमध्ये भारताच्या कर्णधार पदावरून राजीनाम्यानंतर पण मी एक फलंदाज म्हणून संघाचे समर्थन करत राहीन.
आता कोहलीच्या या घोषणेनंतर टी20 मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद कोण सांभाळणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल आधीच अनेक नावांची चर्चा झाली आहे. आज आम्ही तुम्हाला त्या दोन नावांविषयी सांगणार आहोत जे आता कोहलीऐवजी टी20 सामन्यात टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळू शकतात. हेही वाचा Sunil Gavaskar यांच्या वक्तव्याने पुन्हा गोंधळ, T20 WC साठी टीम इंडियात आर अश्विनच्या निवडीवर केली धक्कादायक टिप्पणी
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माला टी20 चे कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे. अनेक वेळा क्रिकेट कॉरिडॉरमध्ये अशी चर्चा झाली आहे की कोहलीनंतर रोहित शर्माला टीम इंडियाची कमान मिळेल. कोहली आणि रोहित यांच्यात कर्णधार पदाबाबत मतभेद झाल्याचेही वृत्त होते. परंतु दोन्ही खेळाडूंनी ते फेटाळले. आता रोहित शर्माला टी20 च्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19 पैकी 14 सामने जिंकले आहेत, तर चार गमावले आहेत.
टी20 संघाचा कर्णधार होण्याची शक्यता असलेला दुसरा खेळाडू म्हणजे ऋषभ पंत. रोहित शर्मा कर्णधार पदाच्या शर्यतीत पुढे दिसत असेल, पण या युवा खेळाडूला शर्यतीतून बाहेर मानता येणार नाही. ऋषभ पंत सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. टीम इंडियाने टी20 इंटरनॅशनलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली 45 सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने 29 जिंकले आहेत, तर 14 हारले आहेत. दोन सामन्यांचा निकाल आलेला नाही.
कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या विजयाची टक्केवारी 65.11 होती. 2017 च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तो टी20 कर्णधार बनला. तसेच 2021 टी20 विश्वचषक ही पहिली आयसीसी टी20 स्पर्धा असेल ज्यात कोहली कर्णधारपदावरून पायउतार होईल. टी20 क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणून कोहलीचा आश्चर्यकारक विक्रम आहे. त्याने आतापर्यंत 90 सामने खेळले आहेत आणि 52.65 च्या सरासरीने 3159 धावा केल्या आहेत.