
T20 आणि ODI मालिकेत इंग्लंडला धूळ चारल्यानंतर आता टीम इंडियाचा (Team India) सामना वेस्ट इंडिजशी (West Indies) होणार आहे. लवकरच टीम इंडिया कॅरेबियन दौऱ्यावर रवाना होणार आहे. वेस्ट इंडिजमध्ये भारतीय संघ तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. शिखर धवन वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार असेल. रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा भाग असणार नाहीत. रोहित शर्मा टी20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. चांगली गोष्ट म्हणजे केएल राहुलचेही टी20 मालिकेत पुनरागमन झाले आहे.
याशिवाय हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा हे देखील टी20 संघात असतील. मात्र, विराट कोहली वनडे आणि टी20 मालिकेत दिसणार नाही. पहिला एकदिवसीय सामना 22 जुलैला त्रिनिदादमध्ये होणार आहे. तर दुसरी वनडे 24 जुलै असून शेवटचा एकदिवसीय सामना 27 जुलैला होईल. याप्रमाणेच पहिला टी20 सामना 29 जुलैला त्रिनिदादमध्ये खेळतील. तर उर्वरित चार सामने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान होणार आहेत. हेही वाचा IND vs WI: भारतीय संघाविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ जाहीर
तिसऱ्या वनडेसाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), रुतुराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (डब्ल्यूके), संजू सॅमसन (डब्ल्यूके), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.
5 टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवी बिष्णोद, रवी कुल्दीप यादव , भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंग.