आज भारतीय हॉकीच्या (India Hocky Team) पुरुष संघाने ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) इतिहास रचला आहे. भारताने जर्मनीला (India vs Jermany) 5-4 ने हरवून 41 वर्षांच्या पदकाची प्रतीक्षा संपवली आहे. भारताने जर्मनीवर शानदार विजय मिळवत कांस्यपदक (Bronze medal) जिंकले. भारतीय संघाच्या शानदार विजयाबद्दल देशभरातून अभिनंदन होत आहे. अनेक लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. देशात सर्व स्तरावर भारतीय हॉकी संघाचे कौतूक होत आहे. अनेक दिग्गज नेते, सिने क्षेत्रातील मंडळी तसेच सामान्य जनता या ऐतिहासिक क्षणाचा आनंद व्यक्त करत आहे. भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन करणारे अनेक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने पडत आहेत. दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा (Indian cricket team) माजी खेळाडू गौतम गंभीरने (Gautam Gambhir) हॉकी संघाला अभिनंदन करणारं एक ट्विट (Tweet) केलं आहे. मात्र ते ट्विट आता चर्चेत आलं आहे. तुम्ही पण विचारात पडला असाल आता इतकं काय लिहिलं आहे त्याने की ते चर्चेला आलं आहे.
गौतम गंभीरने केलेल्या ट्विटमुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्याच्या ट्विटवर क्रिकेट चाहते नाराज होणार असं चित्र दिसून येत आहे. दरम्यान गंभीरने ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, 1983, 2007 किंवा 2011 चा विश्वचषक विसरा, हॉकीतील हे पदक कोणत्याही विश्वचषकापेक्षा मोठे आहे. असे ट्विट त्याने केले आहे. या ट्विटमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी येऊ शकते. गौतम गंभीर स्वत: एक क्रिकेट खेळाडू असून देखील त्याने अशा प्रकारचे ट्विट करणे हे कितपत योग्य आहे. हे आता क्रिकेट चाहतेच ठरवतील.
Forget 1983, 2007 or 2011, this medal in Hockey is bigger than any World Cup! #IndianHockeyMyPride 🇮🇳 pic.twitter.com/UZjfPwFHJJ
— Gautam Gambhir (@GautamGambhir) August 5, 2021
भारतीय संघाने 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये आपल्या आठपैकी शेवटची सुवर्णपदके जिंकल्यानंतर 41 वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकले आहे. मॉस्को ते टोकियो या प्रवासात 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू न शकल्याने आणि प्रत्येक ऑलिम्पिकमधून रिकाम्या हाताने परत येताना अनेक निराशांचा समावेश आहे. आठ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला भारत एकदा 1-3 ने पिछाडीवर होता पण दबाव दूर करण्यात यशस्वी झाला होता. आठ मिनिटांत चार गोलसह विजय नोंदवला.