ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना स्कॉटलंडमधील गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले आहे. युके मधील खलिस्तानींना समर्थन करणार्‍यांकडून ही कृती करण्यात आली आहे. ब्रिटीश शीखांना टार्गेट केले जात असल्याने भारतीय दूतावासांना रोखल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्कॉटलंडच्या दौर्‍यावर असलेल्या दोराईस्वामी यांना Albert Drive वरील Glasgow Gurudwara मध्ये जाण्यापासून रोखलं आहे. या ठिकाणी त्यांची गुरूद्वारा कमिटी सोबत मिटींग झाली. व्हिडिओमध्ये दोन कार्यकर्ते कार पार्कमध्ये उच्चायुक्तांच्या कारकडे जाताना दिसत आहेत आणि कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत पण ते आतून बंद आहे. गुरुद्वारा समितीचे सदस्य हस्तक्षेप करत नसल्याने गाडी रिव्हर्स घेऊन पुन्हा जात असल्याचं पहायला मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)