US Shooting:  युनायटेड स्टेट्समध्ये गोळीबाराची आणखी एका घटना समोर आली आहे. सोमवारी चॅपल हिल येथील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील विज्ञान इमारतीत एका शूटरने एका प्राध्यापकाची हत्या केली. या घटनेमुळे परिसर हादरलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉडिल लॅबमधून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अहवाल आल्यानंतर तीन तासांनंतर त्यांनी संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. दरम्यान गोळीबार चालू असताना काही विद्यार्थ्यांनी खिडकीतून बाहेर उड्या मारल्या आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)