सध्या रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. रशियाने ज्याप्रकारे युक्रेनवर हल्ले केले आहे त्याची संपूर्ण जग निंदा करत आहे. अनेक देशांनी वेळोवेळी इशारा देऊनही रशिया माघार घ्यायला तयार नाही. अशात विविध देशांकडून रशियावर निर्बंध घालण्यास सुरुवात झाली आहे. अशा निर्बंधामुळे रशिया संपूर्ण जगात सर्वात नावडता देश बनला आहे. अनेक जागतिक कंपन्यांनी रशियामधील आपली सेवा निलंबित केली आहे. याआधी नेटफ्लिक्सने रशियामधील आपली सेवा बंद केली होती. आता माहिती मिळत आहे की, मॅकडोनाल्डने रशियातील आपले सर्व रेस्टॉरंट्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)