India Pakistan War: भारत-पाकिस्तान हल्ल्यांदरम्यान भारत सरकारकडून एक मोठे विधान समोर आले आहे. भविष्यात कोणताही दहशतवादी हल्ला भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली (Act of War) जाईल. दहशत पसरवणाऱ्या शत्रू देशाला त्यानुसार उत्तर दिले जाईल, असं मोदी सरकारने स्पष्ट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठका सतत सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उच्चस्तरीय बैठकही बोलावली होती. 7 लोक कल्याण मार्ग येथे झालेल्या या बैठकीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस आणि तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख उपस्थित होते.
भविष्यात होणारे कोणताही दहशतवादी कृत्य युद्धाची कृती समजले जाईल - मोदी सरकार
India has decided that any future act of terror will be considered an Act of War against India and will be responded accordingly: Top GoI sources pic.twitter.com/zZSAXzu3o6
— ANI (@ANI) May 10, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)