इजिप्तच्या हर्घाडा येथील रिसॉर्टमध्ये पोहताना एका रशियन व्यक्तीला शार्क माशाने जिवंत गिळले आहे. हर्घाडाच्या एका लोकप्रिय इजिप्शियन रिसॉर्टला भेट देणाऱ्या इतर पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यापासून काही फूट अंतरावर एका माणसाला शार्कने जिवंत खाल्लेले पाहिले. ही घटना ड्रीम बीच हॉटेलच्या समुद्रकिनाऱ्यावर घडली. हर्घाडा येथील रशियाचे कौन्सुल-जनरल व्हिक्टर वोरोपायेव यांनी देशाच्या TASS वृत्तसंस्थेला सांगितले की, हा प्राणघातक हल्ला गुरुवारी झाला. त्यांनी सांगितले की, शार्कच्या हल्ल्यामुळे एका रशियनचा मृत्यू झाला. पीडितेची ओळख 23 वर्षीय ‘व्ही. पोपोव्ह’ अशी करण्यात आली आहे. ही व्यक्ती पर्यटक नव्हती. पोपोव्ह अनेक महिन्यांपासून इजिप्तमध्ये राहत होता. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शार्क माशा पोपोव्हला आपल्याकडे ओढून घेऊन खाताना दिसत आहे. (हेही वाचा: Escalator Accident Video: सरकता जिना अचानक उलटा फिरला, पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे लोक कोसळले)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)