मेट्रो, मॉल असो की एखादे मोठे हॉटेल आजकाल सरकते जिने जवळपास सर्वच ठिकाणी पाहायला मिळतात. सुरुवातीला या सरकत्या जिन्यांवर पाय ठेवायलाही घाबरणारी मंडळी. आता चांगलीच सरावली आहेत. त्यामुळे जवळपास सर्वच नागरिक सरकत्या जिन्याचा उपलब्धतेनुसार लाभ घेतात. त्यामुळे जिन्यांवरुन चालण्याचा त्रास वाचतो. खास करुन गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि लहान मुले यांना त्याचा फायदा अधिक. पण हाच सरकता जिना उलटा फिरला तर?

दक्षिण कोरिया येथील सरकत्या जिन्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात असेच घडले आहे. सरकता जिना अचानक उलटा धावू लागला. त्यामळे झाले असे की, सरकत्या जिन्यावर चढलेले लोक अचानक मागे फेकले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात जिन्यावरील लोक पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहेत. या घटनेत 14 लोक जखमी झाल्याचे समजते.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)