रशिया युक्रेन मध्ये होणाऱ्या युध्दाचा ताण सगळ्या जगावर येत आहे. अश्याच परिस्थित्तीत बांग्लादेशला आता याचे नुकसान झाले आहे, मिळालेल्या माहितीनुसार युक्रेनच्या बंदरावर असलेले बांगलादेशी जहाजही रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याच्या तडाख्यात आले आहे. युक्रेनच्या मीडियानुसार, यामध्ये बांगलादेशी असलेल्या एका क्रू मेंबरचाही मृत्यू झाला आहे. या जहाजाचे नाव आहे बांग्लार समृद्धू असे आहे. रशियाने युक्रेनची राजधानी कीववर मोठा हवाई हल्ला केला आहे. युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाजवळ स्फोट झाले आहेत. यासोबतच रशियाने युक्रेनच्या दोन बंदरांना वेढा घातला आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने अनेक रशियन नागरिकांवर निर्बंध लादले आहेत.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)