ब्रिटनच्या राजघराण्यातील प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल यांच्या कारचा अमेरिकेत पाठलाग करण्यात आला आहे. त्यांच्या प्रवक्त्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले की, ही अतिशय गंभीर बाब आहे. प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांच्या कारचा सुमारे दोन तास पाठलाग करण्यात आला. यावेळी एक मोठा अपघातही टळला. प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काल रात्री न्यूयॉर्कमध्ये ही घटना घडली. यावेळी मेगनची आई डोरियाही कारमध्ये होती. किंग चार्ल्सच्या राज्याभिषेकानंतर प्रथमच मेगन आणि हॅरी एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रिन्स हॅरी, मेगन आणि तिची आई एमएस फाऊंडेशन फॉर वुमनच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यानंतर पापाराझी फोटोग्राफर्सनी त्यांचा पाठलाग केला. प्रिन्स हॅरीची आई प्रिन्सेस डायना यांचे 1997 मध्ये पॅरिसमध्ये एका कार अपघातात दुःखद निधन झाले होते. डायना ज्या कारमध्ये स्वार होती त्या कारचाही असाच पाठलाग करण्यात आला होता. (हेही वाचा: Mexico: मेक्सिकोत ट्रक-ट्रेलर आणि व्हॅनच्या धडकेत 26 जणांचा मृत्यू, अपघातानंतर लागली आग)
Britain's Prince Harry, his wife Meghan and her mother were involved in a "near catastrophic car chase" involving paparazzi photographers, a spokesperson for the prince said. It occurred after the couple had attended an awards ceremony held in New York: Reuters
(File photo) pic.twitter.com/nFHYszD7mE
— ANI (@ANI) May 17, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)