पाकिस्तानने अफगाणिस्तानातील सत्ताधारी तालिबानविरोधात कारवाई करण्यास सुरु केली आहे. पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने आपल्या देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरितांनी 1 नोव्हेंबरपर्यंत देश सोडून जावे, असे जाहीर केले आहे. या मुदतीबाहेर राहणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. बलुचिस्तानमधील मस्तुंग येथे झालेल्या प्राणघातक आत्मघाती स्फोटानंतर काही दिवसांनी हा निर्णय घेण्यात आला आहे. या स्फोटामध्ये 60 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानचा दावा आहे की, अलीकडील बहुतेक दहशतवादी घटनांमध्ये अफगाण नागरिकांचा सहभाग आहे. अशा परिस्थितीत तालिबानला धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानने आता 11 लाखांहून अधिक अफगाण निर्वासितांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

मंगळवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय कृती योजनेवरील सर्वोच्च समितीच्या बैठकीनंतर, अंतरिम गृहमंत्री सरफराज बुगती म्हणाले की या बैठकीत बेकायदेशीर स्थलांतरितांना स्वेच्छेने देश सोडण्यासाठी 1 नोव्हेंबर ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. (हेही वाचा: Shooting at Bangkok Shopping Mall: Siam Paragon Mall मध्ये गोळीबारात 3 ठार, 4 जखमी; 14 वर्षीय आरोपी अटकेत)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)