Nepal Govt Recalls 11 Ambassadors: नेपाळ सरकारने भारत आणि अमेरिकेसह 11 देशांतील राजदूतांना परत बोलावले आहे. TOI च्या वृत्तानुसार, पंतप्रधान पुष्प कमल दहल  यांनी नेपाळी काँग्रेससोबतची युती तोडून केपी शर्मा ओली यांच्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळशी (यूएमएल) युती केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. 11 देशांमधून परत बोलावण्यात आलेले सर्व राजदूत नेपाळी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून नियुक्त करण्यात आले होते. नेपाळचे भारतातील राजदूत डॉ.शंकर शर्मा, अमेरिकेतील राजदूत श्रीधर खत्री यांच्यासह ब्रिटन, उत्तर कोरिया, कतार, स्पेन, डेन्मार्क, इस्रायल, सौदी अरेबिया, मलेशिया आणि पोर्तुगाल येथील नेपाळचे राजदूत परत गेल्याचे काठमांडू पोस्टच्या वृत्तातून समोर आले आहे.

पाहा पोस्ट:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)