अमेरिकेत भारतीय दुतावासाच्या बाहेर खालिस्तानी समर्थकांनी (Khalistani Supporter) प्रदर्शन केले. यावेळी त्यांनी भारतीय पत्रकार (Indian Journalist) ललित के झा यांना शिवीगाळ करत त्यांच्या वर हल्ला केलाय. वॉशिंग्टन डीसी (Washington DC)मधल्या भारतीय दुतावासाबाहेर ललित झा यांच्यावर हा हल्ला झाला. यावेळी खालिस्तानी समर्थकांनी भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात अपमानास्पद वक्तव्य देखील केली. यानंतर पत्रकार ललित के झा यांच्यावर हल्ला करण्यात आला. पत्रकारांनी आपल्या ट्विटमध्ये लिहले की खालिस्तानी समर्थकांनी त्यांच्या कानावर लाठ्यांनी मारले आपण हे ट्विट रुग्णालयातून केले असल्याचे म्हटले.
पहा व्हिडिओ -
Thank you @SecretService 4 my protection 2day 4 helping do my job, otherwise I would have been writing this from hospital. The gentleman below hit my left ear with these 2 sticks & earlier I had to call 9/11 & rushed 2 police van 4 safety fearing physical assault👇. pic.twitter.com/IVcCeP5BPG
— Lalit K Jha ललित के झा (@lalitkjha) March 25, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)