Indonesia's Presidential Election 2024: इंडोनेशियामध्ये आज 14 फेब्रुवारी रोजी नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान पार पडले. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी आपल्या दोन कार्यकाळाची मर्यादा पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीत इंडोनेशियातील जनतेने आपला नवा राष्ट्रपती निवडण्यासाठी या निवडणुकीत मतदान केले. बुधवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संसदीय प्रतिनिधींची निवड होणार आहे. या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. अशात आता संरक्षण मंत्री प्रबोवो सुबियांतो (Prabowo Subianto) यांनी अनधिकृत आकडेवारीच्या आधारावर इंडोनेशिया अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. 72 वर्षीय सुबियांतो यांनी स्वत:ला लोकप्रिय आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो यांचे उत्तराधिकारी म्हणून सादर केले होते. बुधवारी दुपारी संपूर्ण द्वीपसमूहात कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय मतदान झाले. निवडणूक आयोगाने प्रमाणित केलेल्या द्रुत-गणना केंद्रांवरून प्राथमिक आणि अनौपचारिक निकाल दुसऱ्या दिवशी अपेक्षित होते. अधिकृत आणि अंतिम निकाल साधारण महिनाभरात येतील. (हेही वाचा: PM Modi In Abu Dhabhi: अबुधाबीमध्ये 'अहलान मोदी' कार्यक्रमात पीएम नरेंद्र मोदींनी भारतीय समुदायाला केले संबोधित, म्हणाले- 'भारताला तुमचा अभिमान आहे')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)