Global Sextortion: आधुनिक जगात आपण आपले जीवन सोपे करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो, मात्र कधी-कधी याच तंत्रज्ञानाचा फायदा घेत काही लोक गुन्हेगारीचा मार्ग अवलंबतात. नुकतीच घडलेली घटना ऑस्ट्रेलियातील आहे, जी वाचल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. अलीकडेच ऑस्ट्रेलियन कोर्टाने पाकिस्तानी वंशाच्या मुहम्मद झैन उल अबेदिन रशीदला (Muhammad Zain Ul Abideen Rasheed) 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. रशीदवर जगभरातील शेकडो मुलींना कॅमेऱ्यावर लैंगिक कृत्ये करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. एक प्रसिद्ध यूट्यूबर असल्याचे भासवून रशीद मुलींना जाळ्यात ओढायचा.
ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांच्यामते ही घटना देशाच्या इतिहासातील ‘सर्वात वाईट लैंगिक अत्याचार प्रकरणांपैकी एक’ आहे. या प्रकरणी 2020 मध्ये त्याच्या घरावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले. मंगळवारी न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली. पर्थ पार्कमध्ये आपल्या कारमध्ये 14 वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल रशीद आधीच पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. (हेही वाचा: Gang Rape in Jodhpur: जोधपूरच्या सरकारी रुग्णालयात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; दोन जणांना अटक, तपास सुरु)
पाकिस्तानी युट्युबरने 20 देशांतील 286 मुलींचे केले लैंगिक शोषण-
A #Pakistani-origin man has been sentenced to 17 years in jail for over one of the worst online child sexual abuse schemes in #Australia, targeting hundreds of victims in the country and overseas
Know more 🔗 https://t.co/hdtFY0ezqH pic.twitter.com/LKImHsN1Na
— The Times Of India (@timesofindia) August 29, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)