आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ (Geeta Gopinath) यांना बढती मिळाल्याचे वृत्त आहे. गीता गोपीनाथ यांना जानेवारीत IMF च्या उपव्यवस्थापकीय संचालक बनवले जाईल. 49 वर्षीय प्रख्यात भारतीय-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जानेवारी 2019 मध्ये IMF मध्ये मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून सामील झाले होत्या. म्हैसूरमध्ये जन्मलेल्या गोपीनाथ या ग्लोबल फायनान्शियल इन्स्टिट्यूटच्या पहिल्या महिला मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत. IMF मध्ये सामील होण्यापूर्वी त्या हार्वर्ड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय अभ्यास आणि अर्थशास्त्राच्या प्राध्यापक होत्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)