World's First Epilepsy Device Implanted In Skull: जगात प्रथमच एपिलेप्सीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रुग्णाच्या कवटीत यंत्र बसवण्यात आले आहे. ब्रिटनच्या डॉक्टरांनी ही कामगिरी केली आहे. ज्या ब्रिटीश मुलाच्या कवटीत हे उपकरण बसवण्यात आले त्याचे नाव ओरन नेल्सन असून, त्याचे वय 13 वर्षे आहे. सोमवारी एका अहवालात ही माहिती देण्यात आली. या उपकरणाचे नाव न्यूरोस्टिम्युलेटर आहे जे मेंदूला सिग्नल पाठवते. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, हे उपकरण बसवल्यानंतर एपिलेप्टिक फेफरे 80 टक्क्यांनी कमी झाले आहेत. या उपकरणाचे रोपण करण्याची शस्त्रक्रिया ऑक्टोबर 2023 मध्ये झाली. ग्रेट आर्मंड स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये चाचणी तत्त्वावर करण्यात आलेली ही शस्त्रक्रिया आठ तास चालली.
युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन, किंग्ज कॉलेज हॉस्पिटल आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांच्या भागीदारीत ही चाचणी घेण्यात आली. ओरनला वयाच्या तीन वर्षापासून लेनोक्स-गॅस्टॉट सिंड्रोमने ग्रासले आहे. हा सिंड्रोम एपिलेप्सीचा एक प्रकार आहे. ओरनच्या आईने सांगितले की, शस्त्रक्रियेनंतर ओरनच्या आयुष्यात चांगले बदल झाले आहेत. झटके कमी झाले आहेत. (हेही वाचा: Girl Dies After Eating Pizza: काय सांगता? पिझ्झा खाल्ल्याने 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू; जाणून घ्या काय घडले)
पहा पोस्ट-
First Child Brain Implant for Epilepsy Appears Successful
A new implantable device has significantly reduced seizure frequency and severity in children with severe epilepsy, as shown in a recent UK clinical trial.
The rechargeable device, mounted on the skull, provides… pic.twitter.com/GwSPaCM6Ks
— Neuroscience News (@NeuroscienceNew) June 24, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)