Elon Musk to Support New Trump PAC: अमेरिकेच्या या निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठ्या लोकांचा पाठिंबा मिळत आहे. आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क देखील त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. एलोन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना केवळ पाठिंबाच दिला नाही, तर त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी प्रत्येक महिन्याला $45 दशलक्ष देणगी देण्याची योजना आखली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तानुसार, टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे सीईओ एलोन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला आर्थिक मदत करण्याची योजना आखली आहे. रिपोर्टनुसार, मस्क आता दर महिन्याला $45 दशलक्ष इतकी मोठी देणगी देऊन ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचाराला बळ देणार आहेत. भारतीय चलनात ही रक्कम दरमहा 376 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यंदाच्या निवडणुकीत विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्यासमोर कडवे आव्हान उभे करत आहेत, ज्यांच्यासमोर त्यांना गेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. (हेही वाचा: 'Hawan' For Donald Trump's Well-Being: महामृत्युंजय मंत्राचा जप आणि हवन; हिंदू सेनेनी केली डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यासाठी खास पूजा)

पहा पोस्ट- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)