Dogs Survive By Eating Owner’s Leg: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथील एका संस्थेने 27 जुलै रोजी जवळजवळ 28 कुत्र्यांची एका घरातून सुटका केली. हे सर्व कुत्रे घरात बंदिस्त होते, ज्यांना अनेक दिवसांपासून अन्न मिळाले नव्हते. या कुत्र्यांच्या मालकाचा घराताच मृत्यू झाला, त्यानंतर हे कुत्रे मालकाचा डावा पाय खाऊन 7 दिवस जिवंत राहिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय मालक अट्टापोल चारोएनपिथक यांचा मृतदेह घराच्या दुसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये आढळून आला. प्रकरण बँकॉकमधील ख्लोंग सॅम वा जिल्ह्यातील आहे.

अहवालानुसार, गेल्या आठवडाभरापासून अट्टापोलची कार शेजाऱ्यांच्या घरासमोर उभी होती. शेजाऱ्याने अनेकदा अट्टापोलच्या घराची बेल वाचवली, आत दिवे चालू होते मात्र आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यानंतर काही दिवस अट्टापोल न दिसल्याने शेजाऱ्याने पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसोबत प्राण्यांना मदत करणाऱ्या संस्थेचे लोकही तिथे आले. घर उघडल्यानंतर तिथले दृष्य पाहून सर्वांना धक्काच बसला. घर कचरा आणि कुत्र्यांच्या विष्ठेने भरलेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यांचा मालक अट्टापोल हा मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासह इतर आजारांनी त्रस्त होता. त्याचा 7 दिवसांपूर्वी घरात मृत्यू झाला व त्यानंतर कुत्र्यांनी त्याचा पाय खाऊन आपली गुजराण केली. (हेही वाचा: Tick Bite: इबोलासारख्या जीवघेण्या विषाणूचा स्पेनला धोका, एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर WHOचा इशारा)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)