गेल्या काही दिवसांमध्ये जगभरातून अनेक बोट अपघाताच्या बातम्या समोर आल्या आहेत, ज्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. आताही स्पेनमधून अशीच एक घटना समोर येत आहे. स्पॅनिश स्वायत्त समुदाय असलेल्या कॅनरी बेटांवर जाणाऱ्या डिंगीवरील किमान 35 स्थलांतरीत लोक बुडाले असल्याची माहिती मिळत आहे. डिंगी ही एक प्रकारची छोटी बोट असते, जिला अनेकदा मोठ्या जहाजाने वाहून नेले जाते.
स्थलांतर-केंद्रित संस्था वॉकिंग बॉर्डर्स आणि अलार्म फोनने बुधवारी सांगितले की, या डिंगीमध्ये एकूण 59 लोक होते, जे कॅनरी बेटांकडे जात होते. वाटेत ही डिंगी बुडाली. स्पॅनिश सागरी बचाव सेवेतील एका स्त्रोताने सांगितले की, ग्रॅन कॅनरियाच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे 88 मैलांवर मोरोक्कन-नेतृत्वाखाली केलेल्या ऑपरेशनमध्ये 24 लोकांना या बुडत्या डिंगीतून वाचवण्यात आले. (हेही वाचा: Greece Boat Tragedy: ग्रीसमध्ये शेकडो प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज बुडाले; 300 पाकिस्तानी लोकांच्या मृत्यूची भीती, पीएम शाहबाज शरीफ यांनी घोषित केला राष्ट्रीय शोक)
At least 35 people feared dead after migrant boat sinks en-route to Spain's Canary Islands
— BNO News (@BNONews) June 21, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)