मागील आठवड्यामध्ये गेटवे ऑफ इंडिया कडून एलिफंटा कडे जाणार्‍या बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये अनेकांचे जीव वाचवण्यामध्ये यांनी मोलाची मदत केली. अनेकांसाठी 'देवदूत' ठरलेल्या आरिफ बामणे ला उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री' या त्यांच्या निवासस्थानी बोलावून त्याचं कौतुक केले आहे. आरिफ हा बोटमास्टर होता. 'नीलकमल' बोटीजवळ असलेल्या दुसर्‍या एका बोटीवर तो होता. त्याने अनेकांचे जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली आणि त्यांचे प्राण वाचवले आहेत.

आरिफ बामणे चं उद्धव ठाकरेंकडून कौतुक  

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)