US Mass Shooting: युएस येथील सॅनफोर्ड, फ्लोरिडा येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. या गोळीबारात 10 जण जखमी झाले आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर 16 वर्षीय संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. सेमिनोल काउंटी शेरीफ ऑफिसच्या हवाल्याने स्थानिक मीडियाला माहिती दिली की, काल रात्री अनकॉर्पोरेटेड सॅनफोर्डमध्ये कॅबाना लाइव्ह इव्हेंट दरम्यान गोळीबार झाला. यात 10 जणांना गोळ्या लागल्यानंतर 16 वर्षीय तरुण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा- आता इराकमध्ये समलैंगिक संबंध ठरणार गुन्हा; कायदा मोडल्यास होऊ शकतो 15 वर्षांपर्यंत तुरुंगवास)
Police: 10 people shot at Sanford, Florida event venue; 16-year-old suspect in custody
— BNO News (@BNONews) April 28, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)