American Citizenship: अमेरिकेत स्थायिक होणे ही भारतीयांची पहिली पसंती ठरत आहे. अमेरिकेत स्थायिक होणाऱ्या भारतीय नागरिकांबाबत एक अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार 2023 मध्ये 59000 हून अधिक भारतीयांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले आहे. यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या 2023 च्या वार्षिक अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष 2023 अखेर 8.7 लाख परदेशी नागरिक अमेरिकेचे नागरिक बनले आहेत. त्यापैकी 1.1 लाखांहून अधिक मेक्सिकन नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले आहे. यानंतर भारतीयांची संख्या 59,100 आहे.

तिसऱ्या क्रमांकावर फिलिपाइन्सच्या नागरिकांचा समावेश आहे. फिलीपिन्सच्या सुमारे 44,800 नागरिकांना आणि डोमिनिकन रिपब्लिकच्या 35,200 नागरिकांना अमेरिकन नागरिकत्व देण्यात आले आहे. मात्र या अर्जदारांनी यूएस नागरिकत्वासाठी पात्र होण्यासाठी इमिग्रेशन आणि नॅशनॅलिटी ऍक्ट (INA) मध्ये नमूद केलेल्या काही आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे, गैर-नागरिकाने अमेरिकेमध्ये रहिवासी दर्जासाठी पात्र होण्यासाठी किमान 5 वर्षे कायदेशीर स्थायी रहिवासी म्हणून व्यतीत करणे आवश्यक आहे, तर अमेरिकन नागरिकाच्या जोडीदाराने कायदेशीर स्थायी रहिवासी म्हणून किमान 3 वर्षे व्यतीत करणे आवश्यक आहे. (हेही वाचा: Abu Dhabi Hindu Mandir: अबुधाबीमध्ये उभा राहिले पहिले हिंदू मंदिर; 14 फेब्रुवारीला PM Narendra Modi करणार उद्घाटन)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)