इराण आणि इस्त्राइल यांच्यात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्त्राइल मधील महत्वाचे शहर तेल अवीवला जाणारी उड्डाणे तात्पुरती स्थगित केली आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने रविवारपासून आपल्या सर्व शैक्षणिक संस्था अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. इराणने शनिवारी इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. त्यांना हवेत नष्ट करण्याचा दावा इस्रायलने केला आहे.
पाहा पोस्ट -
Air India temporarily suspends flights to Tel Aviv, says official
— Press Trust of India (@PTI_News) April 14, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)