देशातील चौथी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा कंपनी विप्रो 15 नोव्हेंबरपासून हायब्रीड वर्क पॉलिसी लागू करणार आहे. याअंतर्गत कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान 3 दिवस कार्यालयात यावे लागणार आहे. यापूर्वी टीसीएस आणि इन्फोसिसनेही कर्मचाऱ्यांसाठी 'वर्क फ्रॉम ऑफिस' धोरण जाहीर केले होते. टीसीएसने कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाच दिवस कार्यालयात येणे बंधनकारक केले आहे, तर इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना महिन्यातून 10 दिवस कार्यालयात येण्यास सांगितले आहे. विप्रोचे एचआर अधिकारी सौरभ गोविल यांनी मेलमध्ये म्हटले आहे की, '15 नोव्हेंबरपासून सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयात यावे लागेल. या बदलाचा उद्देश टीमवर्कला चालना देणे, एकमेकांमध्ये अधिक संवादासाठी वाव निर्माण करणे आणि विप्रोची संस्कृती मजबूत करणे हा आहे.’ याव्यतिरिक्त, विप्रोने कर्मचार्‍यांना इशारा दिला आहे की जर त्यांनी नवीन हायब्रिड वर्क पॉलिसीचे पालन केले नाही तर त्यांना 7 जानेवारी 2024 पासून कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

(हेही वाचा: Nokia Layoffs: नोकियामध्ये तब्बल 14,000 लोकांच्या नोकऱ्या जाणार; विक्री घसरल्यानंतर खर्च कमी करण्याची तयारी सुरू)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)