नुकतेच मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी घोषणा केली आहे की, व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी तीन नवीन प्रायव्हसी फीचर्स सादर करण्यात येणार आहेत. व्हॉट्सअॅपच्या या वैशिष्ट्यांमुळे वापरकर्त्यांना मेसेजिंग दरम्यान त्यांचे संभाषण अधिक सुरक्षित करता येईल. ही नवी 3 फीचर्स यूजर्ससाठी उपलब्ध असलेल्या इतर प्रायव्हसी फीचर्समध्ये भर घालतील.
यातील एक महत्वाचे फिचर म्हणजे तुम्ही ऑनलाईन असल्याची स्थिती ठराविक लोकांपुरतीच मर्यादित ठेऊ शकाल. जेव्हा तुम्हाला तुमची ऑनलाइन स्थिती खाजगी ठेवायची असेल, तेव्हा तुम्ही WhatsApp वर तसा पर्याय निवडू शकता. या द्वारे तुम्ही ऑनलाइन असताना कोण तुम्हाला पाहू शकेल आणि कोण पाहू शकणार नाही, हे तुम्ही ठरवू शकाल. हे फिचर या महिन्यात सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआउट सुरू होईल.
Keep your head in the game with online presence ⚽️ Our new privacy features let you control who can see when you’re online 🔒 pic.twitter.com/EjYj1yrRfS
— WhatsApp (@WhatsApp) August 17, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)