सध्या देशातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाईल फोन आहे. प्रत्येक लहान-मोठ्या कामासाठी लोक मोबाईलचा वापर करत आहेत. अशात युपीआय (UPI) पेमेंट किंवा ऑनलाइन पेमेंटच्या मदतीने लोकांचे जीवन अधिक सोपे झाले आहे. अगदी मॉलपासून ते भाजी घेण्यापर्यंत लोक युपीआयचा वापर करून व्यवहार करत आहेत. परंतु आता 1 एप्रिल 2023 पासून युपीआयवर वॉलेट वापरून व्यवहार केल्यास व्यापाऱ्याला वॉलेट शुल्क लागू होईल. व्यवहार जर 2,000 पेक्षा जास्त असेल, तर व्यापाऱ्याकडून 1.1% दराने वॉलेट शुल्क आकारले जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)