XPoSat Satellite Launched: इस्रोने (ISRO) नवीन वर्षात (New Year 2024) नवा इतिहास रचला आहे. आज भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आपल्या वर्षातील पहिल्या अंतराळ मोहिमेत क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह (XPoSat) प्रक्षेपित केला आहे. इस्रोचा पहिला क्ष-किरण पोलारिमीटर उपग्रह (EXPOSAT) क्ष-किरण स्त्रोताचे रहस्य उलगडण्यास आणि 'ब्लॅक होल'च्या रहस्यमय जगाचा अभ्यास करण्यास मदत करेल. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. (हेही वाचा - XPoSat Launching: नवीन वर्षात नवा इतिहास रचण्यासाठी इस्रो सज्ज! कृष्णविवरांचे रहस्य उलगडण्यासाठी एक्स्पो उपग्रह आज रवाना होणार)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)