चंद्रयान 3 चा अंतिम टप्पा आता जवळ आला आहे. इस्त्रो कडून 23 ऑगस्ट दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅन्डिंग करण्यासाठी काऊंटडाऊन सुरू झाले आहे. आज (22 ऑगस्ट) इस्त्रो ने ट्वीट करत उद्याच्या लॅन्डिंग साठी 'सारं सुरळीत' असल्याचं ट्वीट करण्यात आलं आहे. यामुळे आता भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. रशियाचं Luna-25 mission चंद्रावर उतरू न शकल्यानंतर आता चंद्रयान 3 ही कमाल करून दाखवणार का? याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान स्थिती अनुकूल नसल्यास हे लॅन्डिंग 27 ऑगस्टला होण्याचा अंदाजही बोलून दाखवला जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)