मेटाने अखेर भारतासाठी देखील व्हेरिफिकेशन सर्व्हिस सेवा सुरू केली आहे. याआधी कॅनडासारख्या देशांमध्ये मेटाचे ब्लू सबस्क्रिप्शन सुरू करण्यात आले होते. भारतासोबतच इतर अनेक देशांमध्ये मेटा व्हेरिफाईड फीचर लॉन्च करण्यात आले आहे. मेटा व्हेरिफाईड अंतर्गत, लोकांना ब्लू टिक मिळेल आणि याशिवाय अनेक प्रकारची विशेष फीचर्स उपलब्ध असतील. मेटा व्हेरिफिकेशन अंतर्गत, पैसे देऊन इन्स्टाग्राम खाते देखील सत्यापित केले जाऊ शकते. भारतात,  iOS आणि Android वर व्हेरिफिकेशन सर्व्हिस सेवेची किंमत प्रति महिना 699 रुपये असेल, तर वेबची किंमत 599 रुपये असेल. जे वापरकर्ते पैसे देऊन व्हेरिफिकेशन सर्व्हिस घेतील त्यांना ब्लू टिक मिळेल. यासाठी सरकारी ओळखपत्र द्यावे लागेल. याशिवाय अशा खात्यांना विशेष सुविधा मिळतील, ज्यामध्ये विशेष कस्टमर सपोर्ट उपलब्ध असेल. आत्तासाठी कस्टमर सपोर्ट इंग्रजीमध्ये उपलब्ध असेल, परंतु ते लवकरच हिंदीसाठी आणले जाईल. (हेही वाचा: LinkedIn प्रोफाईलवर करता येणार Identity Verification; जाणून घ्या Feature आणि लिक्डइन ओळख पडताळणीची प्रक्रिया)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)