Lay Off: येत्या काही दिवसात Amazon India आपल्या 1000 कर्मचार्‍यांना काढून टाकणार- Report

अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी नोकरकपातीबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, 2023 च्या सुरुवातीला आणखी कपात होण्याची शक्यता आहे.

Lay Off: येत्या काही दिवसात Amazon India आपल्या 1000 कर्मचार्‍यांना काढून टाकणार- Report
Amazon (PC - Pixabay)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, Amazon India येत्या आठवड्यात 1000 हून अधिक कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे, जे संपूर्ण कर्मचार्‍यांच्या 1% आहे. Amazon Global ने एका दिवसापूर्वी जगभरातील सुमारे 18000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केल्यानंतर ही बातमी समोर आली आहे. अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी नोकरकपातीबद्दल माहिती दिली आणि सांगितले की, 2023 च्या सुरुवातीला आणखी कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी, मेटा ने व्यवसाय पुनर्रचना आणि खर्चात कपात करण्याचा भाग म्हणून जागतिक स्तरावर आपल्या 13,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. यासोबतच ई-कॉमर्स कंपनी Amazon ने भारतातील घाऊक वितरण व्यवसाय बंद केला आहे. 2022 मध्ये कंपनीने भारतात बंद केलेला हा तिसरा व्यवसाय आहे. हा व्यवसाय कर्नाटकातील तीन शहरांमध्ये होता- बेंगळुरू, हुबळी आणि म्हैसूर.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 06, 2023 09:55 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).