PSLV-C56/DS-SAR Mission: चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो आता एक नवीन मिशन सुरू करणार आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) आपल्या पुढील मोहिमेची तयारी करत अलून लवकरच ही मोहीम पूर्ण करणार आहे. भारतीय अंतराळ संस्था 30 जुलै रोजी सहा सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 मोहीम प्रक्षेपित करेल. ISRO ने माहिती दिली की PSLV-C56 सह सहा सह-प्रवासी उपग्रह 30 जुलै रोजी सकाळी 06.30 वाजता सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जातील. (हेही वाचा - Mission Gaganyaan: अंतराळात मोठी झेप घेण्यासाठी इस्रो सज्ज; मिशन गगनयानच्या SMPS ची यशस्वी चाचणी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)