ChatGPT Accounts Hacked: आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टूल ChatGPT संदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. एका रिपोर्टमध्ये असे सांगितले जात आहे की, ChatGPT च्या सुमारे 1,00,000 खात्यांची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे आणि डेटा हॅकर्स फोरम डार्क वेबवर विकला जात आहे. जून 2022 ते मे 2023 दरम्यान हा डेटा लीक झाला. ग्रुप-आयबीच्या अहवालानुसार, लीक झालेला डेटा सायबर क्राइममध्ये वापरला जाऊ शकतो. ChatGPT च्या या डेटा लीकमध्ये भारतातील वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती देखील समाविष्ट आहे. यामध्ये सुमारे 12,632 भारतीय चॅटजीपीटी वापरकर्त्यांचा डेटा समाविष्ट आहे.
या डेटा लीकमध्ये पासवर्ड, ब्राउझर कुकीज, क्रेडिट कार्ड तपशील यांसारख्या डेटाचा समावेश आहे. ChatGPT डेटा लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही गेल्या महिन्यात मोठा डेटा लीक झाला होता. त्यानंतर सॅमसंगने चॅटजीपीटीवर बंदी घातली होती. सॅमसंगनंतर अॅपलनेही चॅटजीपीटीवर बंदी घातली आहे. त्याच वेळी, Google ने आपल्या कर्मचाऱ्यांना ChatGPT आणि Bard सारख्या AI चॅटटूलपासून दूर राहण्यास सांगितलं असून त्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्यासोबत शेअर न करण्याचा सल्ला दिला आहे.
#ChatGPT accounts hacked, data of over 1 lakh compromised; India tops list: Report
Read here: https://t.co/g9t3u1iYMk pic.twitter.com/PB5VailmaY
— Mint (@livemint) June 22, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)