Twitter Verification New Update 2023: एलॉन मस्कने नुकतेच एका ट्विटद्वारे माहिती दिली की, तुमचे ट्विटर ब्लू टिक कधीपासून हटवले जाईल. जर तुम्ही देखील ट्विटर वापरकर्ते असाल तर तुम्हाला आता ब्लू टिकसाठी पैसे द्यावे लागतील. सीईओ एलॉन मस्क यांनी म्हटले आहे की जे वापरकर्ते पैसे देत नाहीत त्यांना ब्लू टिकचा लाभ मिळणार नाही.
एलॉन मस्क यांनी सांगितले होते की 20 एप्रिलपासून ट्विटरवरील लेगसी ब्लू टिक मार्क व्हेरिफाईड अकाऊंटमधून काढून टाकले जाईल. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "20 एप्रिलपासून लेगसी ब्लू टिकमार्क काढले जातील." तसेच, जर ब्लू टिक आवश्यक असेल तर मासिक शुल्क भरावे लागेल, त्यानंतरच खात्यावर ब्लू टिक चिन्ह राहील.
Tomorrow, 4/20, we are removing legacy verified checkmarks. To remain verified on Twitter, individuals can sign up for Twitter Blue here: https://t.co/gzpCcwOXAX
Organizations can sign up for Verified Organizations here: https://t.co/YtPVNYypHU
— Twitter Verified (@verified) April 19, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)