स्पेनच्या अँटिट्रस्ट वॉचडॉगने मंगळवारी सांगितले की त्यांनी, ऍमेझॉन (Amazon) आणि ऍपलवर (Apple) इतर विक्रेत्यांची ऑनलाइन विक्री मर्यादित करण्यासाठी संगनमत केल्याबद्दल एकूण 194.1 दशलक्ष युरो ($218.03 दशलक्ष) चा दंड ठोठावला आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिले आहे. ऍपलला 143.6 मिलियन युरो आणि ऍमेझॉनला 50.5 मिलियन युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. दोन्ही कंपन्यांकडे या निर्णयावर अपील करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी आहे.

दोन्ही कंपन्यांमध्ये 31 ऑक्टोबर 2018 रोजी करार झाला, ज्याद्वारे ऍमेझॉन हे अधिकृतरित्या ऍपलचे डीलर बनले. आता आरोप आहे की, या दोन कंपन्यांनी स्पेनमधील ऍमेझॉन वेबसाइटवर ऍपल उत्पादनांच्या इतर विक्रेत्यांची संख्या जाणूनबुजून मर्यादित केली. ज्याद्वारे ऍमेझॉन वेबसाईटवर ऍपल डिव्हाइसेसची विक्री करणाऱ्या 90% पेक्षा जास्त किरकोळ विक्रेत्यांवर बंदी घालण्यात आली.

यासह, ऍमेझॉनने स्पेनबाहेरील युरोपियन युनियनमधील किरकोळ विक्रेत्यांची स्पॅनिश ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता देखील कमी केली. या दोन टेक दिग्गजांमधील करारानंतर, स्पेनमध्ये ऑनलाइन विकल्या जाणार्‍या ऍपल उपकरणांच्या किमती वाढल्या आहेत. (हेही वाचा: Free Online Training on AI: आता भारतीय भाषांमध्ये मोफत मिळणार ऑनलाइन Artificial Intelligence प्रशिक्षण; सरकारने लाँच केला खास कार्यक्रम)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)