भारतीय कुस्तीपटू रवी दहियाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल खेळांमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने पहिले सुवर्णपदक जिंकले. रवी दहिया पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत आहे. भारताचा स्टार कुस्तीपटू रवी कुमार दहिया याने राष्ट्रकुल स्पर्धेत प्रथमच पदक जिंकले आहे. त्याचे पहिले पदक सुवर्ण आहे. रवीने फ्रीस्टाइल 57 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत नायजेरियाच्या अबिकवेनिमो विल्सनचा 10-0 असा पराभव केला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)