राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टर्सची चमक कायम आहे. गेल्या तीन दिवसांप्रमाणेच सलग चौथ्या दिवशीही भारताला वेटलिफ्टिंगमध्ये आणखी एक पदक मिळाले. भारतासाठी विकास ठाकूरने (Vikas Thakur) हे यश मिळवले. भारताचा हेवीवेट लिफ्टर विकास ठाकूरने पुरुषांच्या 96 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकून आपल्या किटीमध्ये आणखी एक राष्ट्रकुल पदक जोडले. अनुभवी ठाकूरने एकूण 346kg उचलून दुसरे स्थान पटकावले. ठाकूरचे हे दुसरे रौप्यपदक होते, 2014 च्या ग्लासगो आवृत्तीतही ते दुसरे स्थान मिळवले होते.
#CommonwealthGames2022 | Indian weightlifter Vikas Thakur bags silver in Men's 96Kg after lifting a total of 346Kg
(Photo courtesy: SAI) pic.twitter.com/DB8RrLDv8W
— ANI (@ANI) August 2, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)