Paralympics 2024 Google Doodle : पॅरालिम्पिक( Paralympics) खेळांचा उद्घाटन सोहळा पॅरिसमधील सीन नदीच्या काठावर आज 28 ऑगस्ट रोजी होणार आहे. पॅरालिम्पिक खेळांचा पार्श्वभूमीवर गूगलकडून खास डूडल(Paralympic Google Doodle) प्रसारित करण्यात आले आहे. भारतीय वेळेनुसार उद्घाटन सोहळा रात्री 11.30 वाजता सुरू होईल. गूगलकडून प्रसारित करण्यात आलेल्या GIF डूडलमध्ये काही पक्षी हवेत उडताना दिसत आहे. त्याशिवाय, त्यात स्टॅंडअप बाईक दाखवण्यात आली आहे. पॅरालिम्पिक गेम्ससाठी जगभरातून पॅरा ॲथलीट पॅरिसमध्ये पोहचले आहेत. स्पर्धेतील 22 खेळांमध्ये 4400 खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यात एकूण 549 पदके असतील, त्यापैकी 236 पदके महिलांसाठी असतील.(Pramod Bhagat : प्रमोद भगतवर 18 महिन्यांच्या निलंबनाची कारवाई; पॅरिस 2024 पॅरालिम्पिक स्पर्धेला मुकणार)
पॅरालिम्पिक गूगल डूडल
Google Doodle Semarakkan Paralimpiade 2024, 4.400 Atlet Disabilitas Siap Berjuang di Paris https://t.co/cakHrLRKMw
— Tekno Liputan6 (@Lip6Tekno) August 28, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, viral trends and information from social media world, including Twitter, Instagram and Youtube. The above post is embeded directly from the user's social media account and LatestLY Staff may not have modified or edited the content body. The views and facts appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY, also LatestLY does not assume any responsibility or liability for the same.)