1968 मध्ये ओपन एरा सुरू झाल्यापासून विम्बल्डनच्या (Wimbledon) उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिस खेळाडू रॉजर फेडरर (Roger Federer) सर्वात वृद्ध पुरुष ठरला आहे. फेडररने इटलीच्या लोरेन्झो सोनेगोचा (Lorenzo Sonego) 7-5, 6-4, 6-2 असा पराभव केला व आपला 118 वा विम्बल्डन सामना जिंकला आणि 18वी उपांत्यपूर्व फेरी गाठली. फेडररने आजवर 8 वेळा विम्बल्डन चॅम्पियनशिपचा (Wimbledon Championship) मान मिळवला असून तो सध्या 9व्या विजेतेपदापासून दोन पाऊल दूर आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)