टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना (WTC Final 2023) खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर खेळला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने 85 षटकांत 3 गडी गमावून 327 धावा केल्या होत्या. स्टीव्ह स्मिथ नाबाद 95 आणि ट्रॅव्हिस हेड नाबाद 146 धावांवर खेळत आहे. टीम इंडियाकडून मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान, ओव्हलवर दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाला असुन ट्रॅव्हिस हेडनंतर स्टीव्ह स्मिथने शतक ठोकले आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 338/3
Steve Smith loves batting at The Oval 😍
Third century at the ground for the Aussie star ⭐
Follow the #WTC23 Final 👉 https://t.co/wJHUyVnX0r pic.twitter.com/jnZP7Z757F
— ICC (@ICC) June 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)