Mary Kom Announces Retirement: भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम हिने (Mary Kom) निवृत्तीची घोषणा केली आहे. मेरी कोमच्या या घोषणेने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी निवृत्तीचे कारण वय असल्याचे सांगितले आहे. मेरी कोम ही सहा वेळा विश्वविजेती आणि 2012 ऑलिम्पिक पदक विजेती आहे. तिचे पूर्ण नाव मंगते चुंगनीजांग मेरी कोम आहे. आपल्या आयुष्यात अनेक महत्त्वपूर्ण कामगिरी करून तिने भारताचा जागतिक स्तरावर गौरव केला. मेरी कोमच्या निवृत्तीनंतर बॉक्सिंगच्या विश्वातील एका युगाचा अंत झाला आहे. वास्तविक, इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशन (IBA) च्या नियमांनुसार, पुरुष आणि महिला बॉक्सरना फक्त 40 वर्षे वयापर्यंत स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी आहे. तथापि, एका कार्यक्रमादरम्यान 41 वर्षीय मेरी कोमने सांगितले की, तिला अजूनही उच्चभ्रू स्तरावर स्पर्धा करण्याची भूक आहे, परंतु वयोमर्यादेमुळे तिला तिच्या करिअरवर पडदा टाकावा लागेल. (हे देखील वाचा: Rohan Bopanna: रोहन बोपन्नाची ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये धडक, मेन्स डबल्समध्ये जागतिक क्रमवारीत पोहोचला अव्वल स्थानी)
Indian boxing legend and Olympic medallist #MaryKom retires, as the International Boxing Association's rules allow male and female boxers to fight in elite-level only till the age of 40. pic.twitter.com/CtgK2evI8V
— DD News (@DDNewslive) January 25, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)