चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारतीय खेळाडूंनी पहिल्याच दिवशी 5 पदके जिंकली आहेत. भारतासाठी पहिले पदक अर्जुन लाल जाट आणि अरविंद सिंग यांनी रोइंगच्या हलक्या वजनाच्या दुहेरी स्कलमध्ये जिंकले. या जोडीने रौप्यपदक पटकावले. महिला संघाने 10 मीटर एअर रायफलमध्ये भारताला दुसरे पदक मिळवून दिले. मेहुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी यांनी रौप्य पदक जिंकले. बाबूलाल यादव आणि लेखराम यांनी जोडी रोइंग स्पर्धेत भारतीय संघासाठी तिसरे पदक (कांस्य) जिंकले. चौथे पदक: रोईंग-8 मध्ये नीरज, नरेश कलवानिया, नितीश कुमार, चरणजित सिंग, जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार, आशिष आणि धनंजय उत्तम पांडे यांनी भारतासाठी रौप्यपदक जिंकले. रमिताने भारतासाठी पाचवे पदक जिंकले. त्याने 10 मीटर रायफलमध्ये कांस्यपदक जिंकले.

Asian Games 2023 India’s medal winners list
Athletes Sport Event Medal
Ashi Chouksey, Mehuli Ghosh, Ramita Shooting Women's 10m air rifle team Silver
Arjun Lal Jat and Arvind Singh Rowing Men's lightweight double sculls Silver
Babu Lal Yadav and Lekh Ram Rowing Men's pair Bronze
India Rowing Men's eight Silver
Ramita Shooting Women's 10m air rifle Bronze

Asian Games 2023 medals table
Rank Country Gold Silver Bronze Total
1 China 9 1 0 9
2 Hong Kong, China 1 0 0 1
3 India 0 3 2 5
4 Uzbekistan 0 3 1 4
5 Indonesia 0 1 3 4
6 Iran 0 1 0 1
6 Japan 0 1 0 1
8 Macao, China 0 0 1 1
8 Mongolia 0 0 1 0
8 Thailand 0 0 1 1
8 Vietnam 0 0 1 1

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)