आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. 21 वर्षीय ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावले आहे. चीनच्या लिहाओ शेंगने सुवर्णपदक जिंकले, तर कोरियन हाजुन पार्कने रौप्यपदक जिंकले. ऐश्वर्या सिंग तोमरने शूटऑफमध्ये भारताचा सहकारी रुद्राक्ष बाळासाहेब पाटीलचा पराभव करून कांस्यपदक मिळवले. सोमवारी 10 मीटर एअर रायफल संघाने देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. यापूर्वी, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीयम महिला नेमबाजी संघाच्या मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता यांनी 10 मीटर एअर रायफलमध्ये देशाला पहिले पदक मिळवून दिले होते.  (हेही वाचा - Asian Games 2023: रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश पनवार आणि ऐश्वरी प्रताप तोमर यांनी आशियाई खेळात भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले, जागतिक विक्रम मोडला)

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)