Hangzhou Asian Games 2023: यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. भारताने आतापर्यंत नेमबाजीत 13 पदके जिंकली आहेत. भारताने एकूण 24 पदके जिंकली आहेत. यातील निम्म्याहून अधिक पदके नेमबाजीत आली आहेत. भारतीय नेमबाजांनी चार सुवर्णपदके जिंकली आहेत, तर भारताच्या खात्यात एकूण सहा सुवर्णपदके आहेत, आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतीय पुरुष नेमबाज संघाने 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले. सरबज्योत सिंग, शिव नरवाल आणि अर्जुन सिंग चीमा या भारतीय त्रिकुटाने चीनचा एका गुणाने पराभव करत एकूण 1734 गुणांसह सांघिक सुवर्णपदक जिंकले. व्हिएतनामने 1730 सह कांस्यपदक जिंकले. सरबजोत (580) आणि अर्जुन (578) अनुक्रमे 5 व्या आणि 8 व्या स्थानावर राहिले आणि वैयक्तिक स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. शिवा (576) 14 व्या स्थानावर राहिला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)