भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी-चिराग शेट्टी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांनी दक्षिण कोरियाच्या चोई सोई ग्यु आणि किम वोन हो यांचा 21-18, 21-16 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारताने प्रथमच बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. सात्विक-चिरागच्या आधी भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये कोणीही सुवर्णपदक जिंकले नव्हते. यावेळची आशियाई स्पर्धा भारतीय पुरुष बॅडमिंटनसाठी उत्तम ठरली आहे. हांगझू येथे सुरू असलेल्या खेळांमध्ये पुरुषांच्या सांघिक प्रकारात भारताने रौप्यपदक पटकावले होते. तसेच एचएस प्रणॉयला कांस्यपदक मिळाले.
HISTORY CREATED! It is 🇮🇳's first ever Badminton GOLD 🥇 Medal in Asian Games ⚡
🏸 Satwik and Chirag wins gold medal in Men's Doubles after beating Korean pair 21-18, 21-16.#AsianGames2022 #IndiaAtAG22 pic.twitter.com/NVdiv7qTOO
— Doordarshan Sports (@ddsportschannel) October 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)